आवाहन

Wednesday, July 31, 2013

जयाचे वाचे पुढा भोजे । अखंड नाम नाचत असे माझे ।

                             जयाचे वाचे पुढा भोजे । अखंड नाम नाचत असे माझे ।
                               जे जन्मसहस्त्री  वोळगिजे ।एकवेळ यावया ।।206।। ज्ञा.9
 


भगवान श्रीकृष्ण म्हणतात , ''जे माझे नाम एका वेळी मुखात यायला सहस्त्र जन्माचे पुण्य लागते  ते माझे नाम या संतांच्या मुखात अखंड नाचत आहे ''.

याचाच अर्थ मुखातुन एकवेळ नामाचा उच्चार करणे म्हणजे मागचे सहस्त्र जन्म सत्कारणी लावल्या सारखे आहे.

जशी एखादी कष्टसाध्य गोष्ट सुलभ होण्यास तिची सवय पडावी लागते मग तिच्यात जशी सहजता येते तसेच नामाच्या बाबतीत आहे, सुरुवातीस निर्धाराने नाम घेता घेता तेही हळुहळु सहज होउन अखंड वाचेपुढे नाचत राहते.

किंबहुना ''अनंत जन्माचे तप एक नाम'','' बहुत सकृताची जोडी । म्हणुनी विठ्ठली आवडी'' असे माउलींनी याच अर्थाने म्हटले आहे.


 jayache vacha pudha bhoje akhand naam nachat ase maze dnyaneshwari ovi adhyay                           

No comments:

Post a Comment