आवाहन

Friday, July 19, 2013

आवडे हें रूप गोजिरें सगुण । पाहतां लोचन सुखावले ॥१॥
आतां दृष्टीपुढें ऐसाचि तूं राहे । जों मी तुज पाहें पांडुरंगा ॥धृ 
लांचावलें मन लागलीसे गोडी । ते जीवें न सोडी ऐसें झालें ॥३॥
तुका म्हणे आम्हीं मागावें लडिवाळी । पुरवावी आळी मायबापें ॥४॥

No comments:

Post a Comment