आवाहन

Friday, August 9, 2013

एकदेशीया व्यापका ।सरिसा पाड ।

पैं जे वानी श्यातुका ।तेचि वेगळिया वाला येका ।म्हणोनि एकदेशीया व्यापका ।सरिसा पाड ।।25।।
अमृताचिया सागरीं ।जे लाभे सामर्थ्याची थोरी।तेचि दे अमृतलहरी ।चुळीं घेतलिया।।26।।ज्ञानेश्वरी-12

सोन्याच्या शंभर नंबरी लगडीला जो कस असतो तोच कस त्याच्यातुन काढलेल्या लहान तुकड्यात  देखील असतो.त्याचप्रमाने अमृताच्या समुद्रात जे मनुष्याला अमर
करण्याचं सामर्थ्य आहे तितकच सामर्थ्य त्याच्या चुळभर घेतलेल्या पाण्यात देखीलआहे.
त्याचप्रमाणे माझं अव्यक्त व्यापक रुप जेवढं श्रेष्ठ , तेवढीच श्रेष्ठता माझ्या सगुण रुपात देखील आहे.
निर्गुणाचा बोध कठीण असल्याकारणाने सगुणाचा आधार घेउन निर्गुणाप्रत पोचणे या मार्गाला भगवंतानी पुष्टी दिली आहे.  

No comments:

Post a Comment