सुखें वोळंब दावी गोहा । माझें दु:ख नेणा पाहा ।।१।।
आवडीचा मारिला वेडा । होय होय कैसा म्हणे भिडा ।।धृ।।
अखंड मज पोटाची व्यथा । दुध भात साखर तूप पथ्या ।।३।।
दो प्रहरा मज लहरी येती । शुद्ध नाहीं पडे सुपत्ती ।।४।।
नीज नये खाली घालीं फुलें । जवळीं न साहती मुलें ।।५।।
अंगीं चंदन लावितें भाळी । सदा शूळ माझें कपाळीं ।।६।।
निपट मज न चलें अन्न । पायली गहुं सांजा तीन ।।७।।
गेले वारीं तुम्हीं आणिली साखर । सात दिवस गेली साडेदहा शेर ।।८।।
हाड गळोनी आले मांस । माझें दु:ख तुम्हां नेणवें कैसें ।।९।।
तुका म्हणे जिता गाढव केला । मेलियावारी नरका नेला ।।१०।।
अभंग क्र.७ (शिरवळकर)
sukhe volamb davi goha maze dukkh dukkha nena paha
No comments:
Post a Comment