आवाहन

Thursday, April 24, 2014

संत चोखोबाराय निर्याण

संत चोखोबाराय निर्याण (वैशाख वद्य ५ शके १२६०) 
समाधीकाल (वैशाख वद्य १३ शके १२६०-नामदेव पायरी समोर)

मंगळवेढ्याभोंवतें कुसुं घालावया | महारासी न्यावया दूत आले ||१||
महारासमागमें चोखामेळा गेला | काम तें लागला करावया ||२||
सर्वकाळ वाचे विठ्ठल नाम छंद | आठवी गोविंद वेळोवेळा ||३||
चार महिने याचि रीतीनें लोटलें | कुसुं कडाडीलें अकस्मात ||४||
तयाखाली महार बहु चूर झालें | चोख्याने अर्पिलें प्राण देवा ||५||
देव म्हणे नाम्या त्वां जावें तेथें | त्याच्या अस्थि येथें घेऊनि याव्या ||६||
नामा म्हणे कैशा ओळखाव्या | विठ्ठल नाम ज्यामध्ये निघे ||७||

sant chokhoba chokhobaray chokhamela samadhi niryan abhang magalavedha kusu ghalavaya maharasi nyavaya dut aale

No comments:

Post a Comment