चला पंढरीसी जाऊ | रखुमादेवीवरा पाहू ||१||
डोळे निवतील कान | मना तेथें समाधान ||धृ||
संतां महंतां होतील भेटी | आनंदें नाचों वाळवंटी ||३||
तें तीर्थांचें माहेर | सर्व सुखाचे भांडार ||४||
जन्म नाहीं रे आणिक | तुका म्हणे माझी भाक ||५||
अभंग क्र.१७२४ (शिरवळकर)
No comments:
Post a Comment