आवाहन

Monday, April 28, 2014

संत निवृत्तीनाथ समाधी (जेष्ठ वद्य १२ शके १२१६)

संत निवृत्तीनाथ समाधी (जेष्ठ वद्य १२ शके १२१६)

पांच दिवस उत्सव केला निवृत्तीसी | काला अमावास्येसी त्र्यंबकेश्वरी ||१||
प्रतिपदेसी हरी निघाले बाहेरीं | कीर्तन गजरी पुढें होत ||२||
काहीं ऋषिश्वर राहिलें तेथे | गेले ते बहुते अलंकापुरा ||३||
गरुडावरी सिद्ध झाले नारायण | चाललीं विमानें गंधर्वांची ||४||
नामा म्हणे देवा जावें आषाढीसी | आली एकादशी पंढरीये ||५||

pach divas utsav kela nivruttisi kala amavasyesi tryambakeshwari sant nivruttinath samadhi 

No comments:

Post a Comment