नानापरी समजाविते परी न राहे श्रीहरी |
दहीभात कालवोनी दिला वेगी झडकरी |
कडेवरी घेऊनियां फिरलें मी द्वारोद्वारीं ||१||
राधे राधे राधे राधे घेईं श्यामसुंदरा |
नेईं आतां झडकरी आपुलिया मंदिरा ||धृ||
क्षणभरी घरी असता करी खोडी शारंगपाणी |
खेळावया बाहेरी जाता आळ घेती गौळणी |
थापटोनी निजवितां पळोनी जातो राजद्वारा ||३||
राधा घेउनी हरीला त्वरें जात मंदिरी |
हृदयमंचकी पहुडविला श्रीहरी |
No comments:
Post a Comment