परब्रम्ह निष्काम तो हा गौळीया घरीं | वाक्या वाळें अंदु कृष्ण नवनीत चोरी ||१||
म्हणती गौळणी हरीची पाऊले धरा | रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा ||धृ||
लपत छपत येतो हरी हा राजभुवनीं | नंदासी टाकुनी आपण बैसे सिंहासनी ||३||
सांपडला देव्हारीं यासी बांधा दाव्यांनी | शंख चक्र गदा पद्म शारंगपाणी ||४||
बहुतां कष्टे बहुतां पुण्यें जोडिलें देवा | अनंत पवाडे तुमचे न कळती मावा ||५||
नामा म्हणे केशवा अहोजी तुम्ही दातारा | जन्मोजन्मीं द्यावी तुमची चरणसेवा ||६||
parabramha parabrahma nishkam to ha gouliya ghari vakya vale andu krushna krishna navneet navnit chori
No comments:
Post a Comment