संत चोखोबाराय निर्याण (वैशाख वद्य ५ शके १२६०)
समाधीकाल (वैशाख वद्य १३ शके १२६०-नामदेव पायरी समोर)
देवाचे अंचळी उठिला गजर | विठ्ठल नामें अंबर गर्जतसे ||१||
संतसमुदाय पताकांचे भार | लोटले गजर ऐकावया ||२||
वद्य त्रयोदशी वैशाख शुक्रवार | नामाचा गजर महाद्वारी ||३||
ऐसी आनंदानें नामाच्या गजरी | दिली महाद्वारी समाधी त्या ||४||
अस्थि निक्षेपण आपुलिया हाते | करूनि अनंते पाषाण ठेवी ||५||
राही रखुमाबाई कुरवंडी करिती | सत्यभामा आरती ओंवाळित ||६||
नामा म्हणे धन्य विठोबाची कृपा | जाईन माझ्या बापा ओंवाळून ||७||
sant chokhamela niryan samadhi abhanga devache anchali uthila gajar vitthal name ambar garjatase
No comments:
Post a Comment