उजळलें भाग्य आतां
अवघी चिंता वारली।।१।।
संतदर्शनें हा लाभ
पद्मनाभ जोडला ।।धृ।।
संपुष्ट हे हृदयपेटी
करूनि पोटी सांठवू ।।३।।
तुका म्हणे होता ठेवा
तो या भावा सांपडला ।।४।।
अभंग क्र.४८३(शिरवळकर )
No comments:
Post a Comment