संत सोपानदेव समाधी (मार्गशीर्ष वद्य १३ शके १२१५)
स्थळ - सासवड
देव म्हणे नामया मार्गशीर्ष गाढा | जावें सासवडा उत्सवासी ||१||
सोपानासी आम्ही दिधलें वचन | चला अवघे जण समुदाय ||२||
अलंकापुरीची यात्रा केली सांग | मग पांडुरंग सिद्ध झालें ||३||
दुरोनि पताका दिसती मनोहर | उठाविले भार वैष्णवांचे ||४||
निवृत्ति मुक्ताई घेतला सोपान | जातो नारायण कऱ्हे तीरीं ||५||
नामा म्हणे देव गंधर्व सुरगण | चालिले सोपान समाधिसी ||६||
sant sopan sopanadev sopandev samadhi niryan dev mhne mhane margashirsh gadha jave sasavada utsavasi
No comments:
Post a Comment