आवाहन

Tuesday, April 29, 2014

बाळक्रीडा  अभंग क्र.५

शिळा स्फटिकची न पालटे भेदें । दाउनिया छंदे जैसी तैसी ॥१॥
जैसा केला तैसा होय क्षणक्षणा । फेडावी वासना भक्तिभावें ॥२॥
फेडावया आला अवघियांची धणी । गोपाळ गौळणी माय बाप ॥३॥
मायबापा सोडविले बंदीहुनी । चाणूर मर्दुनी कंसादिक ॥४॥
आधिक नाही देणें अरिमित्रा एक । पूतना कंटक मुक्‍त केली ॥५॥
मुक्‍त केला मामा कंस महादोषी । बाळहत्या रासी पातकांच्या ॥६॥
पाप कोठें राहे हरि आठविता । भक्‍ती द्वेषें चिंता जैसा तैसा ॥७॥
साक्षी तयापाशी पूर्वील कर्माच्या । बांधला सेवेच्या ऋणी देव ॥८॥
देव भोळा धांवे भक्‍ता पाठोवाटी । उच्चारितां कंठी मागेमागें ॥९॥
मानाचा कंटाळा तुका म्हणे त्यासी । धावे तो घरासीं भाविकांच्या ॥१०॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||

अभंग क्र-३८१३(शिरवळकर)
shila sphatikachi sfatikachi n palate bhed davuniya chande jaisi taisi 

No comments:

Post a Comment