आधी रचिली पंढरी।
मग वैकुंठ नगरी॥१॥
जेव्हा नव्हते चराचर।
तेव्हा होते पंढरपूर॥२॥
जेव्हा नव्हती गोदा गंगा।
तेव्हा होती चंद्रभागा॥३॥
चंद्रभागेच्या तटी।
धन्य पंढरी गोमटी॥४॥
नासिलीया भुंमडळ।
उरे पंढरीमंडळ॥५॥
असे सुदर्शनावरी।
म्हणुनी अविनाशी पंढरी॥६॥
नामा म्हणे बा श्रीहरी।
आम्ही नाचु पंढरपुरी॥७॥
aadhi rachili pandhari mag vaikunth nagari adhi rachyeli racheeli rachilee
No comments:
Post a Comment