पैल तो गे काऊ कोकताहे | शकून गे माये सांगताहे ||धृ||
उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीण पाऊ |
पाहुणे पंढरीराऊ घरा कैं येती ||२||
दहीभाताची उंडी लाविन तुझ्या तोंडी |
जीवा पढिये तयाची गोडी सांग वेगीं ||३||
दुधें भरुनि वाटी लाविन तुझे वोठी |
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ||४||
आंबया डहाळी फळें चुंबी रसाळी |
आजिचें रे काळी शकून सांगें ||५||
ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणे |
भेटती पंढरीराणे शकून सांगें ||६||
pail to ge kau kokatahe lyrics shakun ge maye sangatahe ud uda re kau tuze sonyane madhavin pau
No comments:
Post a Comment