स्वप्नीचिया गोष्टी । मज धरिलें होतें वेठी ।
झालिया शेवटीं । जालगें लटिकें सकळ ||१||
वायां भाकिली करुणा । मूळ पावावया शीणा ।
राव रंक राणा । कैंच्या स्थानावरी आहे ||धृ||
सोसिलें तें अंगें । खरें होतें नव्हतां जागें ।
अनुभव ही सांगे । दुःखें डोळे उघडीले ||३||
तुका म्हणे संतीं । सावचित केलें अंतीं ।
नाहीं तरि होती । टाळी बैसोनि राहिली ||४||
अभंग क्र-१९४ (शिरवळकर)
swapnichiya svapnichiya goshti maj dharile hote vethi wethi zaliya shevati jage latike sakal
No comments:
Post a Comment