तुझी संगत नाहीं कामाची | मी सुंदरा कोवळ्या मनाची |
मज दृष्टी होईल साची | मग तुझी घेईन चर्या ||१||
कसें वेड लाविलें रे कान्हो गोवळीयां ||धृ||
माझा वंश आहे मोठ्याचा | तू तंव यातीहीन गौळ्याचा |
ऐक्या झालीया नांवरूपाचा | ठावचि पुसलिया ||३||
तुझ्या अंगीची घुरट घाणी | तनु काया दिसती ओंगळवाणी |
मुरली वाजविसी मंजुळवाणी | मनमोहन कान्हया ||४||
तुझ्या ठिकाणीं अवगुण मोठा | चोरी करुनी भरिसी पोटा |
व्रजनारी सुंदरा चावटा | अडविसी अवगुणिया ||५||
सर्व सुखाची कृष्ण संगती | वेनुनादें गाई गोप वेधती |
एका जनार्दनीं हरीरूपीं रमती | त्या व्रजसुंदरीया ||६||
tuzi tujhi sangat nahi kamachi mi sundara kovalya manachi vraj brij
No comments:
Post a Comment