श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे अभंग
फिरविलीं दोन्ही | कन्या आणि चक्रपाणी ||१||
झाला आनंदी आनंद | अवतरले गोविंद ||धृ||
तुटलीं बंधने | वसुदेव देवकीची दर्शनें ||३||
गोकूळासी आलें | ब्रह्म अव्यक्त चांगलें ||४||
निशी जन्मकाळ | आले अष्टमी गोपाळ ||६||
आनंदली मही | भार गेला सकळही ||७||
तुका म्हणे कंसा | आठ भोंविला वळसा ||८||
अभंग क्र.११५१ (शिरवळकर)
shreekrushna shree krushna krishna janm firavili firavile donhi kanya aani chakrapani
No comments:
Post a Comment