हिशोबी हिशोब अवघाचि मिळाला | सूर्य उदय झाला अंतरदृष्टी ||१||
देऊनियां गांठ लाविलें कपाट | साधिलें अचाट गुरुसेवा ||२||
ठेउनियां हात स्वयें ब्रह्म केलें | नाहीं तें उरले मी तू पण ||३||
निळा म्हणे ऐसा गुरुकृपेचा कोवळा | डोळियांचा डोळा दाखविला ||४||
hishobi hishob awaghachi milala sury surya uday zala antaradrishti anataradrushti
No comments:
Post a Comment