आवाहन

Wednesday, April 9, 2014

पसायदान



आतां विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥१||

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥२||
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥३||
वर्षत सकळमंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटो तयां  भूतां ॥४||
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥५||
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥६||
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥७||
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्टविजयें । होआवें जी ।|८||
येथ म्हणे श्रीविश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥९||

-श्रीज्ञानेश्वरी अध्याय १८ वा (ओवी क्र.१७९४ ते १८०२)


aata vishwatmake vishvatmke deve yene vagyadney toshave pasaydan psayadan

No comments:

Post a Comment