कशासाठीं आम्हीं जाळिला संसार | न करा विचार ऐसा देवा ||१||
कैसें नेणों तुम्हां करवतें उदास | माझा प्रेमरस भंगावया ||धृ||
समर्पूनि ठेलों देह हा सकळ | धरितां विटाळ न लजा माझा ||३||
तुका म्हणे अवघी मोकलूनि आस | फिरतों उदास कोणासाठीं ||४||
अभंग क्र.२५२८ (शिरवळकर)
kashasathi amhi jalila sansar n kara vichar aisa deva
No comments:
Post a Comment