। माझे चित्त तुझे पायी। राहे एैसे करी काही ।
। धरोनिया बाही । भव हा तारी दातारा।।1।।
। चतुरा तु शिरोमणी । गुण लावण्याची खाणी ।
। मुकुट सकळा मणी । धन्य तूचि विठोबा ।।धृ।।
। करी या तिमिराचा नाश । उदय होयी प्रकाश ।
। तोडी आशापाश । करी वास हृदयी।।2।।
। पाहे गुंतलो नेणता । माझी असो तुम्हा चिंता ।
। तुका ठेवी माथा । पायी आता राखावे ।।3।।
स्पष्टीकरण-तुकोबा विठ्ठलापुढे हात जोडुन उभे आहेत आणि देवाला म्हणत आहेत ''हे विठ्ठला ! माझं चित्त तुझ्या स्वरुपाच्या ठिकाणी स्थिर होयील असं काहीतरी कर आणि माझा हात धरुन, हे करुणाकरा ! मला हा दुर्घट भवसागर तरुन जाण्यास मदत कर ! तु चतुरांमध्ये चतुर आहेस,गुण-लावण्याची खाण आहेस,सर्वांमध्ये उच्च आहेस,तु सर्वांमध्ये धन्य आहेस आताज्ञानरुपी सुर्याचा उदय करुन माझ्या अज्ञानरुपी अंधाराचा नाश कर''.
''मला उचित करुन तु माझ्या हृदयात विराजमान हो !मी अजाणतेपणे या संसारात गुंतलो आहे , तुझ्याशिवाय मला यातुन सोडवण्यास कुणी समर्थ नाही.''एवढे म्हणून तुकोबा विठ्ठलचरणावर माथा ठेउन देवाला त्यांचे रक्षण करण्याची विनंती करत आहेत.
No comments:
Post a Comment