आवडीचे दान देतो नारायण | बाहे उभारोनी राहिलासे |
जे जयासी रुचे ते करी समोर | सर्वज्ञ उदार मायबाप |
ठायी पडलिया ते चि लागे खावे | ठायींचे घ्यावे विचारुनि |
बीज पेरुनिया ते चि घ्यावे फळ | डोरलीस केळ कैचे लागे |
तुका म्हणे देवा काही बोल नाही | तुझा तू चि पाही शत्रू सखा ||

No comments:
Post a Comment