विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा । जाइन त्याच्या गांवा भेटावया ॥१॥
शीण भाग त्यासी सांगेन आपुला । तो माझा बापुला सर्व जाणे ॥ध्रु.॥
माय माउलिया बंधुवर्गा जना । भाकीन करुणा सकळिकांसी ॥२॥
संत महंत सिद्धि महानुभाव मुनि । जीवभाव जाऊनि सांगेन त्या ॥३॥
माझिये माहेरीं सुखा काय उणें । नलगे येणें जाणें तुका म्हणे ॥४॥

No comments:
Post a Comment