आवाहन

Friday, July 19, 2013

ज्ञानियांचा गुरू

ज्ञानियांचा गुरू राजा महाराव ।
म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें ॥१॥

मज पामरासी काय थोरपण ।
पायींची वहाण पायीं बरी ॥२॥

ब्रम्हादिक जेथें तुम्हां वोळगणे ।
इतर तुळणें काय पुढे ॥३॥

तुका म्हणे नेणे युक्‍तीचिया खोलीं ।
म्हणोनि ठेविली पायीं डोई ॥४॥

No comments:

Post a Comment