आवाहन

Monday, August 5, 2013

पाहे पा ध्वजेचे चिरगुट ।राया जतन करीता कष्ट ।।1।।

                             पाहे पा ध्वजेचे चिरगुट ।राया जतन करीता कष्ट ।।1।।
                                 तैसा मी एक पतित । परी तुझा मुद्रांकित ।।2।।
                                    मसी पत्र ते केवढे ।रावो चालवी आपुल्या पाडे।।3।।
                                        बापरखुमादेविवरदा ।सांभाळावे आपुल्या ब्रीदा ।।4।।

पूर्वापारपासुन ध्वजाला अनन्यसाधारण महत्व आहे.वास्तविक पाहता तो एक कापडाचा तुकडाच ! परंतु त्यावर उमटवलेल्या मुद्रेमुळे त्याला एवढे महत्व प्राप्त होते. की त्याच्या सन्मानासाठी लोक प्राणार्पण करण्यासाठी मागे पुढे पाहत नाहीत.
त्याचप्रमाणे एखादया पत्राची किंमत ती काय  परंतु राजमुद्रेचा ठसा उमटला की तेच पत्र मुल्यवान होते. त्यातील संदेश जनतेकडुन ,सैन्याकडुन शिरोधार्य मानला जातो .  
ही उदाहरणे देउन  माउली ज्ञानेश्वर म्हणतात ,''विठ्ठला,मी एक पामर आहे परंतु माझ्या हृदयात तुझ्या नामाची मुद्रा कोरली गेली आहे.ज्याप्रमाणे आपली मुद्रा असल्याकारणाने राजा त्या ध्वजाचे प्राणपणाने रक्षण करतो त्याप्रमाणे मी हि तुझा मुद्रांकित आहे म्हणून तु माझं पालन करुन तुझं ''भक्तप्रतिपालक'' हे ब्रीद सार्थ कर''.असं म्हणून माउली विठ्ठलाला आपला अंगीकार करण्यासाठी विनवत आहेत.

No comments:

Post a Comment