आवाहन

Thursday, August 8, 2013

हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा

                                        हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।।1।।
                                       गुण गाईन आवडी । हीच माझी सर्व जोडी ।।2।।
                                        न लगे मुक्ती धन संपदा । संतसंग देई सदा।।3।।
                                       तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ।।4।।


संत तुकाराम म्हणतात ''देवा ! तुझं नामसंकीर्तन हेच मी आयुष्यात जोडलेलं धन आहे'' ईथे व्यवहारीक धन तुकोबांच्या लेखी सुद्धा नाही.देवासन्मुख जाण्यासाठी नामस्मरणरुपी धनाची आवश्यकता आहे हे त्यांनी मनोमन जाणले आहे.
ते पुढे म्हणतात ''तुझं नामस्मरण घडावं ,तुझी चरणसेवा साधावी यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेण्यासाठी तयार आहे'' .अर्थ स्पष्ट आहे , तुकोबांनी मोक्ष सुद्धा भक्तीरसापुढे झिडकारला आहे,म्हणून धनसंपत्ती आणि भक्तीला मारक ठरणारी मुक्ती तुकोबांना नको आहे.
भगवंताचा विसर आपल्याला होउ नये एवढचं त्यांचं मागणं आहे आणि हे साध्य करण्यासाठी 'संतसंगती' द्यावी म्हणून ते देवाला विनवीत आहेत'

3 comments:

  1. Very knowledgeable and informative very good

    ReplyDelete
  2. मुक्तीची आवश्यकता नसणे, मुक्तीचा अव्हेर करणे ही तर भक्तीची परमोच्च अवस्था आहे. भक्ताला सायुज्य मुक्ति नको वाटते तशी भगवंतांनाही नको वाटते.श्रीकृष्ण वारंवार अर्जुनाला भानावर आणून आपल्यात विरघळू देत नव्हते.भक्तीचे सुख आत्मसुखापेक्षाही आनंददायक आहे. मग कोण सायुज्यता मागेल? पण ही अवस्था येण्यासाठी आधी सायुज्यताच यावी लागते. ज्याप्रमाणे भगवंत होऊनच भगवंताला शरण जाता येते त्याप्रमाणे मुक्त होऊनच मुक्ति नाकारता येते.
    इथे सूक्ष्मपणे पाहिले तर जगद्‌गुरूंनी नामस्मरण मागितले आहे. हीच मुक्तीची पहिली पायरी आहे.गुणसंकीर्तनात रंगून जाणे म्हणजे मुक्तीच आहे. ते स्वत:च सांगतात की ती तर माझी सगळी प्राप्ती आहे.संतसंग म्हणजे सलोकता आहे, तो त्यांनी सदासाठी मागितला आहे.संत तात्काळ आपल्या सारखे करतात. म्हणजे सरूपता प्राप्त होते.एवढे झाल्यावर सायुज्यतेला असा कितीसा वेळ लागणार? म्हणजे मुक्ति मिळालेल्याच तिला नाकारण्याचा अधिकार प्राप्त होतो.
    प्रत्यक्ष मुक्तिपेक्षा ती मिळवण्याच्या प्रयत्नात खरा आनंद आहे.ब्रह्मगिरीच्या माथ्यावर पोहंचण्यापेक्षा ब्रह्मगिरी चढण्याचा आनंद जास्त

    ReplyDelete
  3. ब्रह्मगिरी चढण्याचा आनंद वारंवार मिळावा म्हणून आपण पुन्हा खाली उतरतो.
    हा आनंद आपल्या प्रमाणे आपल्या असंख्य भक्तांनाही मिळावा म्हणून तुकोबांनी हे दान मागितले आहे. तुकाराम महाराज भक्त शिरोमणी आहेत.आणि जो विभक्त नसतो तोच भक्त असतो, हे सर्वश्रुत आहे.
    मुक्त होऊन मुक्ति न मागणे ही मुक्तीचीच सर्वोच्च अवस्था आहे. तीच सर्वोच्च भक्तीची अवस्था आहे.असे हे सामान्य नियम गुंडाळणारे अनंताचे नियम आहेत.
    न्युटनच्या नियमात प्रकाशाचा वेग म्हणजे अनंत मिळवून आईनस्टाईननी अनंताच्या ठिकाणी सर्व नियम गुंडाळले जातात (warp होतात) हे दाखवून दिले आहे.
    अशी द्वैताद्वैत विरघळणारे भक्तिमुक्तीचे अद्वैत आहे.
    जय गुरुदेव.

    ReplyDelete