चाल केलासी मोकळा ।
बोल विठ्ठल वेळोवेळां ॥1॥
तुज पापचि नाहीं ऐसें ।
नाम घेतां जवळीं वसे ॥ध्रु.॥
पंच पातकांच्या कोडी ।
नामें जळतां न लगे घडी ॥2॥
केलीं मागें नको राहों ।
तुज जमान आम्ही आहों ॥3॥
करीं तुज जीं करवती ।
आणिक नामें घेऊं किती ॥4॥
तुका म्हणे काळा ।
रीग नाहीं निघती ज्वाळा ॥5॥
No comments:
Post a Comment