धाकुट्याचे मुखीं घांस घाली माता।
वरी काय सत्ता शहाणिया॥1॥
ऐसें जाणपणें पडिलें अंतर।
वाढे तों तों थोर अंतराय॥2॥
दोन्ही उभयतां आपणची व्याली।
आवडीची चाली भिन्न भिन्न॥3॥
तुका म्हणे अंगापासूनि निराळें।
निवडिलें बळें रडतें स्तनीं॥4॥
No comments:
Post a Comment