आवाहन

Sunday, April 6, 2014


अवघें ब्रह्मरूप रिता नाहीं ठाव । 
प्रतिमा तो देव कैसा नव्हे ॥1॥ 

नाहीं भाव तया सांगावें तें किती । 
आपुल्याला मतीं पाखंडिया ॥ध्रु.॥ 

जया भावें संत बोलिले वचन । 
नाहीं अनुमोदन शाब्दिकांसि ॥2॥ 

तुका म्हणे संतीं भाव केला बळी । 
न कळतां खळीं दूषिला देव ॥3॥

No comments:

Post a Comment