मांडे पु-या मुखें सांगों जाणे मात ।
तोंडीं लाळ हात चोळी रिते ॥1॥
ऐसियाच्या गोष्टी फिक्या मिठेंविण ।
रुचि नेदी अन्न चवी नाहीं ॥ध्रु.॥
बोलों जाणे अंगीं नाहीं शूरपण ।
काय तें वचन जाळावें तें ॥2॥
तुका म्हणे बहु तोंडे जे वाचाळ ।
तंग तेंचि मूळ लटिक्याचें ॥3॥
No comments:
Post a Comment