राम म्हणता रामचि होईजे।पदी बैसोन पदवी घेईजे ।।१।।
ऐसे सुख वचनी आहे।विश्वासे अनुभव पाहे ।।धृ।।
रामरसाचिया चवी।आन रस रुचती केवी ।।३।।
तुका म्हणे चाखोनि सांगे ।मज अनुभव आहे अंगे ।।४।।
अभंग क्र.३६४३(शिरवळकर )
No comments:
Post a Comment