झाले रामराज्य काय ऊणे आम्हासी।।धरणी धरी पिक गायी वोळील्या म्हैसी ।।१।।
राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवीये।।दळीता कांडीता जेविता गे बाईये ।।धृ।।
स्वप्नीही दु:ख कोणी न देखे डोळा।।नामाच्या गजरे भय सुटले कळीकाळा ।।३।।
तुका म्हणे रामे सुख दिलें आपुलें।।तया गर्भवासी येणे जाणे खुंटले ।।४।।
अभंग क्र.३६५१(शिरवळकर )
No comments:
Post a Comment