धर्म रक्षावया अवतार घेसी । आपुल्या पाळीसी भक्तजना ।।धृ ।।
अंबऋषी साठी गर्भ सोसीयेले । दुष्ट निर्दाळीले कीती एक ।।२।।
धन्य तुज कृपा सिंधु म्हणतील । आपुला तू बोल साच करी ।।३।।
तुका म्हणे तुज वर्णिती पुराणे । होय नारायण दयासिंधु ।।४।।
अभंग क्र.३०३७(शिरवळकर )
No comments:
Post a Comment