योग्याची संपदा त्याग आणि शांति । उभयलोकीं कीर्ति सोहळा मान ॥१॥
येरयेरांवरी जायांचें उसने । भाग्यस्थळीं देणें झाडा वेसीं ॥ध्रु.॥
केलिया फावला ठायींचा तो लाहो । तृष्णेचा तो काहो काहवितो ॥२॥
तुका म्हणे लाभ अकर्तव्या नांवें । शिवपद जीवें भोगिजेल ॥३॥
No comments:
Post a Comment