रांगतु रंगणी चोरितु लोणि धांवोनि धरिति गौळणी । बांधती चरणी देती गा-हाणी यशोदे साजणी ।
दधि घृत भक्षूण तमालनीळे नवल केले साजणी ॥1॥
कृष्ण आळिवा आळिवा । परतोनि माते दावा ॥धृ॥
कृष्णा कान्हा मधुसुदन कामिनी मोहना । योगिध्याना हरस्मरणा गोपी ध्याना मानिती कान्हा बोलति यमुना ।
नेणवसी नेणवसी । अकळुतु नाकळसी ॥2॥
इंद्रनिळा श्रुतीजन किरळा सुरीजघत सांवळा । कंठिँ माळा कौस्तुभ गळां प्रिती तुळसी दळा ।
कासे सेला सोनसळा उभा बळिभद्र जवळा । कृष्ण सांवळा डोळसु । सहज परमहंसु ॥3॥
सदानंदा श्रीमुकुंदा श्रीहरि परमानंदा आनंदकंदा । अभय प्रल्हादा पावक नादा धेनु लुब्धा गोपाळा गोविँदा ।
कृष्ण आमुचा आमुचा । खेळिया गौळियाचा ॥4॥
कर्पूरगोरा मनस्थिरा पुराणा गुणगंभीरा विरादिविरा महाविरा । पांडव दळ साहाकारा मथुरा नगरा कंसासुरा । शिक्षा लाविसी चाणुरा अति सुंदरा तूं पेँडारा बापरखुमादेवीवरा । जाणितले जाणितले माझे मज दिधले ॥5॥
No comments:
Post a Comment