आवाहन

Tuesday, April 8, 2014


श्री रामजन्मकाळाचे अभंग


येतसे दशरथ सुमित्रा मंदिरी।
देखता सामोरी येती झाली॥
न माये आनंद तियेचे मानसी।
ठेवी मस्तकासी चरणावरी॥
घालोनी आसन प्रक्षाळी चरण।
सर्वांगी लेपन तीर्थोदक॥
गंध धुप दीप पुष्पाचिया माळा।
अर्पुनी तांबुल उभी राहे॥
कैकयीचे दु:ख विसरला राव।
पाहुनिया भाव सुमित्रेचा॥
होती जे डोहाळे तुझिये मानसी।
सांग मजपासी पतिव्रते॥
प्राणनाथा ऐसे वाटतसे जीवा।
वडिलांची सेवा अहर्निशी॥
आवडे हे एक नावडे आणिका।
द्यावे मज एक हेची आता॥
ऐकताची ऐसे कांतेचे वचन।
आनंदे निमस्त मन होय॥
घेऊनिया हाती रत्नांचे भुषण।
टाकी ओवाळुन नामा म्हणे॥

yetase dasharath sumitra mandiri ram janm abhang namdev

No comments:

Post a Comment