आवाहन

Tuesday, April 8, 2014


राम जन्माचे अभंग


राजा म्हणे इच्छा तुझिये मानसी। डोहाळे मजसी सांग आता।
येरी म्हणे ऐसे वाटतसे जीवा। द्यावे राज्यपद॥ 
ज्येष्ठासी धाडावे दुरी दिगंतरा। 
न ये समाचार त्याचा आम्हा।
जनात हे निंद्य वेदबाह्य कर्म।
करिता अधर्म पाप बहु।
माझिये मस्तकी ठेवावा हा दोष। तुम्हाकडे लेश नाही काही॥
निंदीतील जन मज वाटे सुख। ऐकताची दुःख राया झाले॥ 
वृश्चिकाचे पेवी तक्षक पडत। घालीता हे घृत अग्निमुखी।
ऐसी व्यथा होय नामा म्हणे त्यासी। 
उठिला त्वरेसी तेथुनिया॥

raja mhne ichha tujhiye mansi manasi dohale majasi sang aata nama sant namdev

No comments:

Post a Comment