कुळगुरु वसिष्ठ सांगे नृपवरा।
असती गरोदर तुझ्या कांता॥
धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे।
त्यांचे पुरवावे मनोरथ॥
ऐकोनिया ऐसे आनंद मानसी।
कैकयी सदनासी जाता झाला॥
मंचकी बैसली होती ते पापिणी।
देखताची नयनी पहुडली॥
सुंदरपणाचा आभिमान मनी।
त्यावर गर्भिणी नामा म्हणे॥
kulguru vasishtha vashishtha sange nrupvara garodar tuzya kanta namdev abhang
No comments:
Post a Comment