आवाहन

Tuesday, April 15, 2014



गौळणींचा थाट निघाला मथुरें हाटालागीं  । तें देखोनि जगदीश धांवला गोप घेउनी वेगीं ।।ध्रु॥ 
कान्ह्या सरसर परता नको आरुता येऊ । तुझा संग झालिया मग मी घरा कैसी जाऊ ।।१।।
सासुरवासिनी आम्ही गौळणी जाऊ दे रे हरी । बहु वेळ लागतां सासूसासरे कोपतील घरी ।।३।।
आम्ही बहुजणी तू येकला शारंगपाणि दिससी येथे । हृदयमंदिरी ठेउनी तुं तें जाऊ मथुरा पंथें ।।४।।
एका जनार्दनीं ब्रम्हवादिनी गोपिया बरवंटा । कृष्णापदीं त्या लीन  झाल्या पूर्णपणें तन्निष्ठा ।।५।।

goulanincha thaat that nighala mathure hata lagi hatalagi te dekhoni jagadish dhavala gop gheuni ghevuni vegi  

No comments:

Post a Comment