कार्तिकिचा सोहळा । चला जाऊ पाहू डोळा । आले वैकुंठ जवळा । सन्निध पंढरीये ।।१।।
पीक पिकले घुमरीं । प्रेम न समाये अंबरीं । अवघी मातली पंढरी । घरोघरीं सुकाळ ।।धृ ।।
चालति स्थिर स्थिर । गरुड टकयांचे भार । गर्जती गंभीर । टाळ श्रुति मृदंग ।।३।।
मिळालिया भद्रजाती । कैशा आनंदे डुल्लती । शुर उठावती । एक एक आगळे ।।४।।
नामामृत कल्लोळ । वृंदे कोँदली सकळ । आले वैष्णवदळ । कळिकाळ कांपती ।।५।।
आस करिती ब्रह्मादिक । देखोनि वाळवंटी चे सुख । धन्य धन्य मृत्युलोक । म्हणती भाग्याचा कैसे ।।६।।
मरण मुक्ति वाराणसी । पितृऋण गया नासी । उधार नाहि पंढरिसी । पायापाशी विठोबाच्या ।।७।।
तुका म्हणे आता । काय करणे आम्हा चिँता । सकळ सिद्धीचा दाता । तो सर्वथा नुपेक्षी ।।८।।
अभंग क्र.१८९(शिरवळकर)
kartikicha kartikecha kartikeecha sohla sohala chala jau pahu dola varanasi gaya vithoba vaishnav
No comments:
Post a Comment