श्रीगुरूचे पायी ठेवी तु विश्वास ।दासाचा तु दास होई त्यांच्या ॥१॥
परब्रम्ह राम वसिष्ठा शरण ।कृष्णे सांदीपनी गुरू केला ॥२॥
वाल्मीक ऋषी नारद उपदेशी ।त्रिभुवनी धन्य वाल्या झाला ॥३॥
एका जनार्दनी गुरू मज भेटला ।मोकळा दाविला मार्ग त्याने ॥४॥
shreeguruche shriguruche shri shree guruche payi paayi thevi tu vishwas wishwas eknath abhang sant
No comments:
Post a Comment