धरिती ज्या हातीं संत कृपावंत | पाळी पंढरीनाथ लळा त्याचा ||१||
न विसंबे त्या घडी पळ युग मानी | दिसों नेदी जनीं केविलवाणे ||२||
पाजी प्रेमपेहे वाहे तया अंकी | म्हणे हे लाडकी तान्ही माझी ||३||
निळा म्हणे दावी स्वहिताचा पंथ | नेदी त्या आघात येऊ आड ||४||
sant dhariti jya hati krupavant pali pandharinath lala tyacha
No comments:
Post a Comment