अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु | मी म्हणे गोपाळु आला गे माये |
चांचरती चांचरती बाहेरी निघालें | ठकचि मी ठेलें काय करुं ||१||
मज करा कां उपचारु अधिक ताप भारू | सखिये सारंगधरू भेटवा कां ||धृ||
तो सांवळा सुंदरु कासे पितांबरू | लावण्य मनोहरु देखियेला ||
भरलिया दृष्टी जंव डोळां न्याहाळी | तंव कोठें वनमाळी गेला गे माये ||२||
बोधुनी ठेलें मन तंव जालें आन | सोकोनी घेतले प्राण माझे गे माये ||
बापखुमादेविवरू विठ्ठल सुखाचा | तेणें कायामनेंवाचा वेधीयलें ||३||
वरील विरहिणी येथे ऐका -गायन लतादीदी
वरील विरहिणी येथे ऐका -गायन लतादीदी
avachita awachita parimalu zulakala alumalu mi mhane gopalu aala ge maye
No comments:
Post a Comment