आवाहन

Monday, April 7, 2014

 मैत्र केला  महाबळी । कामा नये अंतकाळीं ॥१॥

आधीं घे रे रामनाम । सामा भरीं हा उत्तम  

नाहीं तरी यम । दांत खातो करकरा ॥ध्रु.॥

धन मेळविलें कोडी । काळ घेतल्या न सोडी ॥३॥

कामा न ये हा परिवार । सैन्य लोक बहु फार ॥४॥

तववरी  तुमचे बळ । जंव आला नाहीं काळ ॥५॥

तुका म्हणे बापा । चुकवीं चौर्‍याशींच्या खेपा ॥६॥

                                        अभंग क्र.६१(शिरवळकर ) 

No comments:

Post a Comment