आलिया भोगासी असावें सादर । देवावरी भार घालूनियां ||१||
मग तो कृपासिंधू निवारी सांकडें । येर तें बापुडे काय रंक ||धृ||
भयाचिये पोटि दुःखाचिया राशी । शरण देवासी जातां भले ||३||
तुका म्हणे नव्हे काय त्या करितां । चिंतावा तो आतां विश्वंभर ||४||
अभंग क्र-२२९२(शिरवळकर)
aaliya aliya bhogasi asave sadar devavari bhar ghaluniya
No comments:
Post a Comment