आवाहन

Tuesday, April 29, 2014

ऎसे ऎसियानें भेटती ते साधु । ज्यांच्या दर्शनें तुटे भवबंधु । 
जे कां सच्चिदानंदी नित्यानंदु । जे कां मोक्षसिद्धि तीर्थ वंदु रे ॥धृ॥
भाव सर्व कारण मूळ बंदु । सदा समबुद्धि नास्तिक्य भेदु ।
भूतकृपा मोडी द्वेषकंदु । शत्रु मित्र पुत्र सम करीं बंधू रे ॥२॥
मन बुद्धि काया वाचा शुद्ध करी । रुप सर्वत्र देखोनि नमस्कारीं ।
लघूत्व सर्वभावें अंगीकारीं । सांडी मांडी मीतूंपण ऎसी थोरी रे ॥३॥
अर्थकामचाड नाहीं चित्ता । मानामान मोह माया मिथ्या ।
वर्ते समाधानी जाणॊनि नेणता । साधु भेट देती तया अवचिता रे ॥४॥
मनीं दृढ धरीं विश्‍वास । नाहीं सांडीमांडीचा सायास । 
साधुदर्शन नित्यकाळ त्यास । तुका म्हणे जो विटला जाणीवेस रे ॥५॥

अभंग क्र-२०२ (शिरवळकर)

aise ese aisiyane bhetati te sadhu jyanchya darshane tute bhavabandhu

No comments:

Post a Comment