आवाहन

Tuesday, April 29, 2014

संसाराच्या तापें तापलों मी देवा । करीतां या सेवा कुटूंबाची ||१||
म्हणऊनी तुझे आठविले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे ||धृ||
बहुतां जन्मीचा झालों भारवाही । सुटीजे हें नाहीं वर्म ठावें ||३||
वेढीयेलो चोरी अंतर्बाह्यात्कारी । कणव न करी कोणी माझी ||४||
बहु पांगविलों बहु नागविलों । बहु दिस झालो कासाविस ||५||
तुका म्हणे आता धांव घाली वेगीं । ब्रीदे तुझीं जगी दीनानाथा ||६||

अभंग क्र-६७(शिरवळकर)

sansarachya tape tapalo mi deva karita ya seva kutumbachi

No comments:

Post a Comment