आवाहन

Monday, April 28, 2014

संत निवृत्तीनाथ समाधी (जेष्ठ वद्य १२ शके १२१६)

संत निवृत्तीनाथ समाधी (जेष्ठ वद्य १२ शके १२१६)

निवृत्तीराज बैसलें समाधि सूचित | चिन्मय ते ज्योत उजळली ||१||
पुंडलिकें मिठी निवृत्तीच्या गळां | अवघियांच्या डोळां आसुवें येती ||२||
विठोबाचें हृदय आलेंसें भरून | झांकियेले नयन निवृत्तीराजे ||३||
पुंडलिके आणिलें विठोबासी बाहेर | केला नमस्कार वैष्णवांनी ||४||
राही रखुमाबाई बैसल्या गहिवरून | आणिक संत महंत वोसंडीती ||५||
नामा म्हणे हरी शुद्धी नाही सकळां | घालीं आतां शिळा समाधींसी ||६||

sant nivrutti maharaj niryan samadhi nivruttiraje baisale suchit chinmay te jyot ujalali

No comments:

Post a Comment