आवाहन

Monday, April 28, 2014

संत निवृत्तीनाथ समाधी (जेष्ठ वद्य १२ शके १२१६)

संत निवृत्तीनाथ समाधी (जेष्ठ वद्य १२ शके १२१६)

समाधीच्या पाळीं बैसली सकळी | केलिया गोपाळी जयजयकार ||१||
निवृतीसंगे पुंडलिक पांडुरंग | सिद्ध झाले सांग समाधीसी ||२||
निवृत्तीदेवे वंदिलीं सकलांची पाउलें | तीर्थ तें घेतलें विठोबाचें ||३||
पताकाची छाया समाधीसी आली | उतरले खाली निवृत्ती देव ||४||
पुंडलिक पांडुरंग गेले बरोबरी | बैसले आसनावरी निवृत्तीराज ||५||
नामा म्हणे देवा काय पहावें आतां | गेला पंढरीनाथ चिद्भानु तो ||६||

sant nivrutti nath raj nivruttinath samadhi niryan samadhichya pali baisali sakali keliya gopali jayajayakar jayjaykar 

No comments:

Post a Comment